होय मी सत्यच बोलतोय !

मीत्र हो .....
आज आपण एका महाभयंकर अश्या महामारीला संपूर्ण जगासोबत तोंड देत आहोत. अनेक देश आपापल्याया नागकांची शक्य होईल तेवढी काळजी घेत आहेत आणि नागरिक सुध्दा स्वतः ची काळजी घेत आहेत यात अजिबात शंका नाही. मग प्रश्न येतो कुठे सत्य बोलण्याचा हा प्रश्न हे कथन वाचणाऱ्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो.
           कोरोना मुळे अनेक लोक बेरोजगार झाले, अनेकांचे सुखी संसार दुःखाच्या दरीत न कळत ढकलल्या गेले हे त्यांचे त्यांना सुध्दा कळले नाही, अनेक व्यक्तीना मृत्यूने कवेत घेतले, काहींच्या मनावर दुःखाचे थडगे कायमचे बांधल्या गेले, काहींचे नयनाअश्रुंचे पाझर कोरडेठाक पडले.तरी ही जगण्याची आशा मनात जीवंत असल्या मुळे अनेक धाडसी नागरिक स्वतःला सावरुन नव्या उमेदीने , धीराने जगण्याची धडपड करता आहेत. या सर्व परिस्थितित अपवाद वगळून काही व्यापारी , व्यावसायीक , डॉक्टर्स , शैक्षणिक दुकानदार , सामान्य नागरिकांना सर्रास आर्थिक बाबतीत मालाच्या किंमती वाढवून लूटत आहेत. यावर कोणीच काही बोलायला तयार नाही . शासन सुद्धा डोळे लावून ध्यान करत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्याया मालाच्या किमती वाढवून घेतल्या आहेत अश्या द्विधा मनस्थितित हातावर पोट असलेला सामान्य माणूस कात्रित अडकला आहे. उलट अश्या वेळेस त्याला धीर देण्याची गरज आहे.
             बघा पटतयका मला वाटले म्हणून कमी शब्दात हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. अजून ही भरपूर लिहिता येईल पण तूर्तास ऐवढेच !!
धन्यवाद ! !
आपला स्नेही
संजय

Comments

  1. अतिशय सुंदर विचार,
    रविंद्र गुरव

    ReplyDelete

Post a Comment