Posts

होय मी सत्यच बोलतोय !

मीत्र हो ..... आज आपण एका महाभयंकर अश्या महामारीला संपूर्ण जगासोबत तोंड देत आहोत. अनेक देश आपापल्याया नागकांची शक्य होईल तेवढी काळजी घेत आहेत आणि नागरिक सुध्दा स्वतः ची काळजी घेत आहेत यात अजिबात शंका नाही. मग प्रश्न येतो कुठे सत्य बोलण्याचा हा प्रश्न हे कथन वाचणाऱ्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो.            कोरोना मुळे अनेक लोक बेरोजगार झाले, अनेकांचे सुखी संसार दुःखाच्या दरीत न कळत ढकलल्या गेले हे त्यांचे त्यांना सुध्दा कळले नाही, अनेक व्यक्तीना मृत्यूने कवेत घेतले, काहींच्या मनावर दुःखाचे थडगे कायमचे बांधल्या गेले, काहींचे नयनाअश्रुंचे पाझर कोरडेठाक पडले.तरी ही जगण्याची आशा मनात जीवंत असल्या मुळे अनेक धाडसी नागरिक स्वतःला सावरुन नव्या उमेदीने , धीराने जगण्याची धडपड करता आहेत. या सर्व परिस्थितित अपवाद वगळून काही व्यापारी , व्यावसायीक , डॉक्टर्स , शैक्षणिक दुकानदार , सामान्य नागरिकांना सर्रास आर्थिक बाबतीत मालाच्या किंमती वाढवून लूटत आहेत. यावर कोणीच काही बोलायला तयार नाही . शासन सुद्धा डोळे लावून ध्यान करत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्याया मालाच्या किमती वाढवून ...

गुरव सर तुंम्ही सुध्दा ........

 प्रिय मित्र , रविंद्र गुरव सर आपण आय सी टी क्षेत्रात विशेष असे योगदान देत असल्या कारणाने आम्हांला आपला सार्थ अभिमान आहे. आपला मनमिळावू स्वभाव निश्चितच आई पासून दूर गेलेल्या लेकराला जोडण्या सारखा आहे. नंम्रता, प्रामाणिकपणा , आपुलकी, आदरभाव , शालीनता , माणुसकी , सहानुभुती , जी व्हावाळा , स्नेह या सारख्या वैशिष्ठ्ठ्यांनी आपले व्यक्तीमत्व खूलून गेले आहे. आपले कार्य असेच बहरत राहो आणि त्या सुगंधात अनेक लोकांना ज्ञान लाभ होवो हिच सदिच्छा व्यक्त करतो. आणि भावि वाट चाली साठी आभाळ भर गगनभेदी शुभेच्छा देऊन येथे थांबतो. आपला मीत्र प्रा संजय वेडू सूर्यवंशी म्हसदी